Life of Stories

# 1929: देवमाणूस. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

डॅा. सौ. आरती जुवेकर.

Send us a text

"आजोबा, सुकी पुरी ... " नातवाने फर्माईश केली की,  आजोबा एक प्लेट तिखट पाणीपुरी आणि त्यांचा नातू एक प्लेट फक्त सुकी पुरी खाणार. मग आजोबा खिशातून रुमाल काढून त्याचे तोंड पुसणार आणि बॅगेतून छोटीशी बाटली काढून त्याच्या तोंडाला लावणार. त्यानं पूर्ण पाणी प्यायल्यावर शिल्लक राहिलं तर एखादा घोट आपण पिणार आणि त्याला हाताला धरून पलीकडल्या गल्लीत अंधारात नाहीसे होणार.