Life of Stories

# 1934: जीवनाचे मोल. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

डॅा. सौ. आरती जुवेकर.

Send us a text

एकदा विवेकानंद असेच निश्चल ध्यानस्थ बसले होते. बऱ्याच वेळाने त्यांनी डोळे उघडले, तर समोर एक ढाण्या वाघ उभा होता. त्याच्या हिरव्याजर्द पिवळसर डोळ्यात भक्ष्याला न्याहाळणारी भूक होती. स्वामींनी मंदस्मित केलं. वाघ जणू भिक्षेला आला होता! आपल्यामुळे निदान एका जीवाची तरी भूक भागणार आहे, या विचारानं आनंदून त्यांनी डोळे मिटले आणि वाघ झेपावण्याची वाट पाहू लागले. काही क्षण तसेच सरले. त्यांनी आश्चर्यानं डोळे उघडून पाहिलं, तर तो वाघ दूर निघून जाताना दिसला. त्या वाघाच्या डोळ्यात दिसलेली भूक खोटी नव्हती आणि आता त्याचं गुर्गुरत जंगलात जाणंही खोटं नव्हतं. हा प्रसंग नंतर आपल्या गुरुबंधूंना सांगताना स्वामीजी उदगारले की, " माझ्याभोवती परमेश्वरी कृपेचं कवच आहे आणि त्यामुळेच माझं रक्षण झालं आहे, हे मला जाणवलं. माझ्या हातून काही कार्य व्हायचं आहे आणि ते पार पडेपर्यंत माझी या जगातून सुटका नाही, हे मला पुरतं समजलं होतंच, पण ईश्वर माझं रक्षण करीत आहे, हेदेखील मला कळलं होतं."