Life of Stories

# 1935: बायकोची नोकरी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

डॅा. सौ. आरती जुवेकर.

Send us a text

मी घरात शिरलो, पाहुण्यासारखा खुर्चीवर बसलो. बूट काढले, पाठोपाठ कपडे उतरविले. बाथरुममधे गेलो, हात - पाय - तोंड स्वच्छ धुतलं. टॉवेलनी हात पाय पुसत बैठक खोलीत येऊन बसलो . क्षणातच केळे घातलेला शिरा आणि उप्पीट असलेली डिश समोर आली. मला आश्चर्य वाटलं. फारच भूक लागली असल्यानं पुढं आलेलं न बोलताच सारं पोटात ढकललं. पाठोपाठ चहा आला, तसा चहा घेतला. जोराची ढेकर दिली. मन प्रसन्न झालं. कारण पोटातील यज्ञाला आहुती मिळण्याचं भाग्य लग्नानंतर प्रथमच माझ्या वाट्याला आलं होत. आज असं कसं काय घडलं, ते जाणून घ्यावयाची तीव्र इच्छा निर्माण झाली. कदाचित माझ्या चेहऱ्यावरील भावना सौने ओळखल्या असाव्यात. तेवढ्यात सौ. माझ्या जवळ आली आणि तिच्या गोड आवाजात म्हणाली “ मी राजीनामा दिलाय बरकां हो !"