Life of Stories

हा स्मृतीभ्रंश किंवा अल्झायमर तर नाही ना..? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

डॅा. सौ. आरती जुवेकर.

Send us a text

एक ६२ वर्षांचे अभियंता घाबरलेल्या अवस्थेत माझ्या दवाखान्यात आले.
गेले सहा महिने त्यांची स्मरणशक्ती खालावत होती. ते बैठका विसरत होते. पार्किंगमध्ये आपली गाडी कुठे लावली आहे हे विसरत होते.
"माझ्या वडिलांना ६५ व्या वर्षी अल्झायमर झाला होता," ते मला म्हणाले. "मलाही तोच आजार झाला आहे."
त्यांच्या पत्नीनेही या सर्व गोष्टींना दुजोरा दिला. प्रगतीतील घट. व्यक्तिमत्त्वात बदल. नेहमीपेक्षा जास्त चिडचिडेपणा ही लक्षणं पण होती.