Life of Stories

# 1937: चमत्कार नेहमी वीज-गडगडाटासह येत नाहीत..! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

डॅा. सौ. आरती जुवेकर.

Send us a text

माझे हात वेगाने हलू लागले. स्पष्टच सांगतो —
मी ते हलवत नव्हतो, मी ते हलताना पाहत होतो.
मी यापूर्वी कधीच न शिकलेली कौशल्ये वापरत होतो. सत्तर वर्षांच्या माणसाला अशक्य असलेली गती आणि अचूकता माझ्या बोटांत कुठूनतरी आली होती. मेंदूच्या देठाजवळ, मिलिमीटर अंतरावर, क्षणाचाही संकोच न करता काम चालू होतं. दिसतही नसणाऱ्या ठिकाणी मी नेमक्या क्लिप्स लावत होतो — कुठलीतरी दैवी जाणीव मला मार्ग दाखवत होती..