Life of Stories

# 1976 : सूर बहार. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 6:46

Send a text

मि. बर्नार्ड स्वतः सतार प्रेमी होते. पंडीत रविशंकर यांचे निस्सीम चाहते होते.भारतातील वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी सतारी मागवलेल्या होत्या. त्यांना माहीत होते,सतार वाजवणे ही एक कला असली तरी सतार बनवणे ही एक वेगळीच कला आहे. 

सतार बनवतांना कुशल कारागीर फक्त पंढरपूरचे आणि लखनौचे भोपळेच वापरतात. पंढरपूरच्या भोपळ्यांची साल जाड असते तर लखनौच्या भोपळ्यांची पातळ. सतार बनवणारे कारागीर त्याच्या पसंतीने भोपळे निवडतात. खाण्याच्या भोपळ्यांपेक्षा हे भोपळे वेगळे असतात. चवीला अत्यंत कडू असतात.