Life of Stories

# 1979 : "ठेवू नका, देऊन टाका." लेखिका संध्या घोलप. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 5:55

Send a text

ति ज्येष्ठांच्या घरात सामानाने ओथंबून वाहणाऱ्या भिंती आणि माळे पाहिले की, “यांच्या पश्चात हे कोण आणि कधी आवरणार?” या विचाराने मलाच अस्वस्थ व्हायला होतं.

मी काय केलं?

वाचनाची आवड असल्यामुळे पुस्तकं विकत घेते; पण वाचून झाली की ती लायब्ररीला किंवा मैत्रिणींना देते. 

उरलेली औषधं केमिस्टकडे परत देते. ही औषधं एखाद्या गरजूंना मोफत द्या, असं त्याला सांगते.

वयोमानामुळे साडी नेसणं कठीण झालं, तेव्हा दोन-तीन साड्या ठेवून बाकी देऊन टाकल्या.

आता माझ्याकडे मॅचिंग चपला नाहीत, दागिने नाहीत, पर्सची चळत नाही; प्लास्टिक पिशव्या किंवा डिस्पोजेबल डब्यांचा साठाही नाही.

आणि गंमत म्हणजे, त्यामुळे काहीच अडत नाही, हेच आता लक्षात आलं आहे.