Life of Stories

# 1985 : आंतरराष्ट्रीय महिला दिन. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 14:22

Send a text

स्त्रीवादी विचारसरणीचा पहिला जाहिर उच्चार झाला तो सन १७९२ मधे मेरी वोल्स्टनक्राफ्ट या तत्त्ववेत्तीने लिहिलेल्या  ' A Vindication of the Rights of Woman (1792)' या पुस्तकातून ज्यात तिने स्पष्ट्पणे लिहिले होते की, ' स्त्रीचे शिक्षण आणि घडण मुळातच पुरुषी वर्चस्व जपण्याचा विचार करून केली जाते. त्यामुळे पुरूषांना काय आवडते हे 'संस्कार' या नावाखाली तिच्या मनावर ठसविले जाते, परंतु स्वतःला मनापासून काय आवडते, ते ठरवून निर्णय घेण्याची सोडाच, त्याचा नुसता विचार करण्याची क्षमताही ती गमावून बसते.' त्यावेळी असे स्पष्ट विचार मांडणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे होते. या परखड विचारांमुळे मेरीला प्रचंड प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले.