Life of Stories

# 2060 : रामायणातील मंथरा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

डॅा. सौ. आरती जुवेकर.

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 8:53

Send us Fan Mail

कैकयच्या अश्वपती सम्राटाची मुलगी कैकेयी राजा दशरथांची तिसरी बायको होती. ती खूपच देखणी आणि साहसी देखील होती. कदाचित या कारणामुळेच राजा दशरथांचे  तिच्यावर जास्त प्रेम होते. लग्नानंतर पाठराखीण म्हणून कैकेयीची ही दासी तिच्यासोबतच अयोध्येस आली होती.
राणी कैकेयी आणि दासी मंथरा ह्या दोघी कैकय देशातील होत्या. मंथरा, राणी कैकेयीची लहानपणापासुन परिचयाची व अतिशय विश्वासू दासी होती. कैकेय देशाच्या राजा अश्वपती यांचा एक भाऊ होता, ज्याचे नाव बृहदश्व होते. त्याला एक मोठ्या डोळ्यांची मुलगी रेखा नावाची मुलगी होती.  ती लहानपणापासूनच कैकेयीची मैत्रीण होती. ती राजकन्या तर होतीच त्याच बरोबर बुद्धिवान सुद्धा होती. लहान वयातच तिला एक आजार झाला. या आजारात तिचं सर्वांग घामाने चिंब व्हायचे, त्यामुळे तिला खूप तहान लागायची.