Life of Stories

# 2108 : "जीवन का जगावं?" पु.ल. देशपांडे. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 5:00

Send us Fan Mail

प्रिय चंदू.

जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं. मग कुठल्याही क्षेत्रात तू ऐस. 

वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे तर तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या. 

My dear boy, whose deaths are justifiable?

परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. 

आणि हिरोशिमा? त्याबद्दल लिहायला हवं का?

ज्या दिवशी जन्माला येणं justifiable होईल त्या दिवशी आपण मरणाचं justification शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे.