Life of Stories

# 2111 : त्सुतोमु यामागुची. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 11:02

Send us Fan Mail

त्या दिवशी  जेव्हा ते तिथून निघण्याच्या तयारीत होते, तेव्हा हिरोशिमावरील आकाशाचे स्वरूप अचानक बदलले. यामागुची यांनी वर पाहिले असता, त्यांना अमेरिकेचे B-29 हे बॉम्बर विमान आकाशातून उडताना दिसले. त्यातून पॅराशूटला जोडलेली एक छोटी वस्तू खाली सोडलेली  होती. काही क्षणांतच, आकाशात एक प्रखर लख्ख प्रकाश पसरला. नंतर त्यांनी याचे वर्णन एखाद्या प्रचंड मॅग्नेशियम फ्लेअरच्या तीव्र झगमगाटा सारखे केले. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी एका खड्ड्यात उडी मारली, पण त्या स्फोटाच्या प्रचंड धक्क्याने ते जमिनीवरून वर उचलले गेले. स्फोटाच्या लाटेने त्याना हवेत भिरकावले आणि जवळच असलेल्या शेतात फेकून दिले.