Life of Stories

# 2112 : अडीच मिनीटात संपवला अपहरणाचा थरार. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 5:47

Send us Fan Mail

कॅप्टन उरी बार-लेव्ह ॲमस्टरडॅमहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एल -अलच्या प्रवासी विमानाचे उड्डाणाची तयारी करत होते. या फ्लाईट्ची (El Al Flight 219 ) सुरुवात तेल अवीवहून झाली होती आणि ॲमस्टरडॅम हा त्यातील दुसरा टप्पा होता.
उड्डाणापूर्वी शिफोल विमानतळावरील एका सुरक्षा अधिकाऱ्याने बार-लेव्ह यांना 'चार प्रवासी संशयास्पद दिसत आहेत' असं सांगितलं. त्यापैकी दोघांकडे सेनेगलचे पासपोर्ट होते आणि त्या दोन्ही पासपोर्टचे क्रमांक सलग होते. उरलेल्या दोघांकडे होंडुरासचे पासपोर्ट होते. विशेष म्हणजे या चौघांनीही विमानाची तिकीटं अगदी शेवटच्या क्षणी काढली होती.