Life of Stories

# 2110 : "438 दिवस समुद्रात...!" ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 9:51

Send us Fan Mail

जगातला सर्वात मोठा महासागर म्हणजे प्रशांत महासागर. याच महासागरात, मेक्सिकोच्या किनाऱ्यावर मासेमारी करणारा होता जोसे साल्वाडोर अल्वारेंगा. त्याच्याकडे होती फक्त सात मीटर लांबीची एक छोटीशी नाव.

एका दिवशी मासेमारीला गेलेला अल्वारेंगा वादळात सापडला. नाव भरकटली… इंजिन बंद पडलं… संपर्क तुटला… आणि सुरू झाला असा प्रवास, ज्याची त्याने कल्पनाही केली नव्हती.

ना जमीन, ना माणूस… ना अन्नाची शाश्वती, ना पिण्याचं पाणी. चारही बाजूंनी फक्त अथांग समुद्र.

वादळं आली, भूक-तहान लागली, निराशा आली… पण जगण्याची इच्छा कायम राहिली.

अशा अथांग समुद्रात ४३८ दिवस एकट्याने जिवंत राहणं… हा चमत्कारच नाही का?