Life of Stories

# 2119 : सहवासाची भूक. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 6:06

Send us Fan Mail

"आई... तुम्ही जेवलात ना?" वैशालीने सहजच विचारलं.
समोर बसलेल्या सुमित्रा काकूंनी हलकंसं हसत उत्तर दिलं, "हो गं सूनबाई... पोटभर जेवले."
पण वैशाली स्वयंपाकघरात गेली, तर सिंकमध्ये ठेवलेल्या स्टीलच्या ताटाकडे तिचं लक्ष गेलं. ताटात अर्धी कोरडी पोळी, थोडंसं पाणी... आणि भाजीला तर हातही लावलेला नव्हता.
पहिल्या दिवशी तिला वाटलं, कदाचित तब्येत बरी नसेल...
पण दुसऱ्या दिवशीही तेच...
तिसऱ्या दिवशीही तेच...
आता मात्र तिच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं.
आई रोज "पोटभर जेवले" असं का सांगतात...?